spot_img
spot_img
spot_img

पीसीसीओईआर चा आणखी एक विक्रम एकाच दिवसात ७८ कॉपी राईटची नोंद

शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्चने  (पीसीसीओईआर) शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविले असून उत्कृष्ट शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. पीसीसीओईआरने एकाच दिवसात ७८ कॉपी राईटची नोंद करून आणखी एका विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.
    पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी विभागाने बौद्धिक संपदा हक्कांमध्ये (आयपीआर) एक उल्लेखनीय टप्पा गाठला. आयटी विभागाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली.
    बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) निर्मितीचे संरक्षण कसे करतात आणि योग्य मान्यता कशी सुनिश्चित करतात. आयपीआर व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या अद्वितीय कल्पना, शोध आणि कार्यांचे संरक्षण कसे करण्यास सक्षम करते याबद्दल सखोल माहिती दिली. तसेच वेगाने प्रगती करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात बौद्धिक संपदेचे महत्व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले.
    आयटी विभागाचे प्रमुख डॉ. संतोषकुमार चोबे यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना कॉपीराइट दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करून एकाच दिवसात ७८ कॉपीराइट दाखल करून उत्पादनांना सुरक्षित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. या उपक्रमाचे समन्वय प्रा. दिव्या पुनवंतवार यांनी केले.
   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!