- महाराष्ट्राची सौंदर्यवती आणि कॅलिस्टा पिजंट यांचा महिला सन्मान उपक्रम
शबनम न्यूज | पिंपरी
महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित कॅलिस्टा पिजंट या संस्थेच्या वतीने “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२५” मेगा शो 5.0 याचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथे झालेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्य आणि जिल्ह्यातून २५ गृहिणींसह वैद्यकीय, पोलीस, कला, संगणक शिक्षण, समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.
यामध्ये नांदेड च्या सौ अविता पुरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकाचा मुकुट, पंधरा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र समाजसेविका अनिता आगरवाल मिसेस इंडिया दिपाली मुंडारे आणि गतविजेत्या श्वेता वाळुंज यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
द्वितीय पारितोषिक छत्रपती संभाजीनगर च्या इरा खान यांना मुकुट, बारा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक विभागून कू कृतिका सिंग – मुंबई आणि पूजा शिंत्रे – पुणे यांना मुकुट, दहा हजार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इतर सर्व सहभागी स्पर्धकांना सोन्याची नथ, पैठणी आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
उत्कृष्ट तीन उत्कृष्ट पुरस्कारा साठी प्रदीप्ता कोटकर -सावंतवाडी, रत्नागिरी ,परी मालवीय आणि गार्गी बागलाने- पुणे यांना पाच हजार रुपयांचे भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले
लहान मुलांच्या गटात प्रथम पारितोषिक ध्रुव राठोड आणि द्वितीय पारितोषिक मयुरी कामटे आणि तृतीय पारितोषिक शिवन्या काकडे यांनी पटकावले.
परीक्षक म्हणून दीपाली मुंढ़रे, पूर्वा मुनोत, नरेश फुलेलु यांनी काम पाहिले. ग्रूमिंग रुपाली मारस्कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाची आऊटफिट स्वाती कांबळे,गौरी मोठे, वैभवी तांबे आणि प्रियंका कांबळे यांनी केले. वेशभूषा आणि केशरचना शैला सुतार आणि कांचन दवंडे टीम यांनी केली. प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका अनिता अग्रवाल ब्रँड अँबेसिडर ऋतुजा जगदाळे, बोर्ड ऑफ डायरेक्टर रंगक्षी गुप्ता , वैष्णवी जयपाल, सोनाली देशपांडे तसेच किड्स सुपरस्टार ब्रँड अँबेसिडर त्रिशा जाधव आणि दुर्वा तेली उपस्थित होते. स्वागत कॅलिस्टा पिजंट चे संचालक संजीव जोग, सूत्र संचालन रेडिओ जॉकी आर. जे. बंड्या यांनी केले नितीन साळुंखे यांनी आभार मानले. , विजया देवर, सारिका डोलणारे आणि आरती शिवले यांनी संयोजनात सहभाग घेतला.