शबनम न्यूज | पुणे
सध्या शाळेला सुट्ट्या पडल्या आहेत तर प्रत्येक पालकांच्या मनात आपल्या पाल्यासाठी काही तरी नवीन ठिकाणाची भेट करून देण्यावर भर असतो. त्यातच पुण्यात अशी बरीच ठिकाणी आहेत जिथे आपण आपल्या मुलांना फिरवू शकतो. असेच एक महत्त्वचं ठिकाण म्हणजे शिवाजी नगर गावठाण येथील सर बाळासाहेब देवधर एव्हिएशन गॅलरी. हे तीन माजली इमारत असून तुम्हाला यात विमान नेमकं असतं कसं? त्याचे प्रकार काय आहेत? युद्धात कोणत्या प्रकारची विमाने वापरण्यात आलेली आहेत? यांची संपूर्ण माहिती मिळते.
गॅलरीची वैशिष्ट्ये/विभाग
पहिला विभाग- एव्हिएशन /विमानांचा इतिहास.
दुसरा विभाग- विमान तसेच हेलिकॉप्टर उडण्यामागचे विज्ञान.
तिसरा विभाग- जगातील सर्व विमानाच्या प्रतिकृती (स्केल मॉडेल ).
चौथा विभाग -हेलिकॉप्टर तसेच ड्रोनचे वेगवेगळे प्रकार.
पाचवा विभाग-विमानतळ, टर्मिनल इमारत, धावपट्टी, उड्डाणाचे व खाली उतरतानाचे दृश्य पाहवयास मिळेल, ए.टी.सी.टॉवर , विमान हेलिकॉप्टर पार्किंग हँगर, इंधन भरण्याची जागा.
विभाग सहा-वायुसेना हेलिकॉप्टर, विमानांचे प्रकार वायुसेने संदर्भात माहिती.
विभाग सात- पॅराग्लायडींग, पॅरा मोटरिंग, स्पेस सायन्स, एव्हिएशन क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी .
विभाग आठ- प्रोजेक्टरच्या खोलीमध्ये सर्व माहिती तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या चित्राफिती दाखविल्या जातात.
येथे विद्यार्थ्यांना विमानाच्या अनेक प्रतिकृती पाहायला मिळणार आहे. तर गॅलरीतील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या विभागात अनेक विमानांच्या प्रतिकृती लावण्यात आलेल्या आहेत यामुळे हा विभाग विद्यार्थ्यांना अधिक आकर्षित वाटतो.
एवढेच काय जर तुम्हाला एव्हीएशन सेक्टरमध्ये करिअर करायचं असेल तर एव्हीएशन गॅलरीला तुम्ही एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे. या सेक्टर मध्ये जास्तीची माहिती नसल्यामुळे आज येथे विद्यार्थी जास्त नाही येत. मात्र या एव्हिएशन गॅलरीच्या माध्यमातून या सेक्टर संबंधित गोष्टीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन पुरवले जाते. या गॅलरी मध्ये नवीन जुने विमानाचे मॉडेल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे जे महाराष्ट्रात कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाही.