पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तसेच विभागीय मंडळातून कोकण विभागानं बाजी मारली आहे. महाराष्ट्र बोर्डाने
नुकतंच पत्रकार परिषद घेऊन
यंदाच्या निकालाची वैशिष्टचे जाहीर केली आहेत. या निकालात त्यांनी विभागनिहाय आकडेवारी, तसेच बारावीच्या कोणत्या विभागाचा निकाल काय याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली आहे. महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीच्या परीक्षेला पुणे,
नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या सर्व विभागातील मिळून १४ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली. यातील १४ लाख १७ हजार ९६९ हे विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यातील १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी पास झाले आहेत. यंदा बारावीचा निकाल
निकाल
कोकण-२६.७४
कोल्हापूर – ९३.६४
मुंबई – २२.९३
संभाजीनगर – ९२.२४
अमरावती – ९१.४३
पुणे-९१.३२
नाशिक-९१.३१
नागपूर – ९०.५२
लातूर – ८९.४६
९१.८८ टक्के इतका लागला आहे. बारावीचा निकाल जाहीर झाला असून विभागनिहाय आकडेवारी कोकण विभाग अव्वल आहे. कोकणचा निकाल सर्वाधिक २६.७४ टक्के इतका आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा मुलींचा निकाल ९४.५८ टक्के इतका लागला आहे. तर मुलांचा निकाल ८९.५१ टक्के इतका आहे.