शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित कार्यकर्त्यांनी “लाडू व पुस्तक तुला” केली असून शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र आमदार, नगरसेवक, सर्व पक्षाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या उपस्थित होते.
आमदार संख्येने अण्णा बनसोडे यांना मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचे उपाध्यक्ष हे पद मिळाल्यानंतर पहिल्याच आज ( रविवार दिनांक ४ मे) वाढदिवसाला कार्यकर्ते, नागरिक यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसला. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ज्येष्ठांचा सन्मान, क्रिकेट सामने, सरबत, अन्नदान वाटप इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात आले. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे ६२ किलो आहे मात्र त्यांची लाडू तुला करताना ७५ किलो शुद्ध तुपाचे लाडू आणण्यात आले. लाडू तुला झाल्यानंतर लाडू आणि पुस्तके वाटप करण्यात आले.