शबनम न्यूज | आकुर्डी
पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह आकुर्डी येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याचे औचित्य साधून साहित्य सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. कस्तुरी राईज फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया मानमोडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा एक दिवसीय सांस्कृतिक गुणगौरव महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सहसंयोजिका हर्षदा गायकवाड यांनी अतिशय नियोजनबद्ध अशी आखणी केली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गीत सादर करून गणेश वंदना आशुतोष पाटील यांच्या ग्रुपचे कलाकारांनी अप्रतिम नृत्य सादर केले. कुमारी चिन्मय सूर्यवंशी हिने महाराष्ट्र शौर्य गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहआयुक्त मुंबई मा. उमेश कोठीकर यांनी भूषविले. नामदेव ढाके पिंपरी चिंचवड मनपा सत्तारूढ सदस्य आणि उपमहापौर शैलजा मोरे , नारायण बडगुजर ,प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे,युवा नेते निलेश बोराटे व प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक निर्माते अभिनेते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती यात चंद्रकांत विसपुते, प्रकाश धिंदले, देव झुंबरे, नितीन धवणे पाटील, शिरीष राणे यांच्यसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या जीवनात हास्याचे महत्त्व पटवून देणारे चार्ली यांच्या रूपात ज्युनिअर चार्ली म्हणून सोमनाथ स्वभावने यांनी बालकलाकारांसोबत मानवता गीत सादर करून त्यावर नृत्य सादर केले. या कार्यक्रमाप्रसंगी धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक पराग सुभाष भामरे यांनी मानवी जीवनात आभार व्यक्त करण्याचे आणि ऋणानुबंध जपण्याचे महत्व रसिकांना पटवून दिलेत.
संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा कस्तुरी राईज फाउंडेशनच्या वतीने कौतुकाची थाप म्हणून मराठी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यात देव झुंबरे, प्रकाश धिंदले, डॉ. अनिल बिऱ्हाडे, डॉ. जितेंद्र देसले, प्रवीण माळी, अजय बिरारी डॉ. अशोक ठाकरे, कु. उन्नती शिरसाठ, सोमनाथ स्वभावणे, पत्रकार शबनम सय्यद, सविता इंगळे, रश्मी बद्दूर कर, अनिता भगत, विकास गोविंद राऊत, सागर सुनील शिंदे, शिवम इंगळे, योगिता पाऊल झगडे, अश्विनी बाविस्कर, वैशाली आनंद अहिरे, गर्भ सामाजिक संस्था वृद्धाश्रम विरार, ब्रह्मांड सेवा संवर्धन फाउंडेशन, डॉक्टर स्वाती गमरे, वाल्मीक सोनवणे, रंजना रांगणेकर, अजय बिरारी, लीना पांडे, राजाभाऊ बनसोडे, ज्योती सूर्यवंशी , उन्नती शिरसाठ, संगीता धोंडफळे इत्यादी मान्यवरांना सामाजिक जाणीव म्हणून कौतुकाची, स्नेहाची कदर म्हणून त्यांच्या कार्याला बळ देण्यासाठी संस्थेच्या वतीने मराठी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विविध मान्यवरांनी या कार्यक्रमात प्रसंगी मनोगत व्यक्त केले यात पाटलांचा बैलगाडा फेम प्रकाश दिंडले यांनी कस्तुरी राईज फाउंडेशन विषयी महाराष्ट्रातील गौरवशाली परंपरा संस्कृती जपण्यासाठी कलाकारांना पाठबळ देण्यासाठी फाउंडेशनच्या कार्याचे आभार व्यक्त केले. चित्रपट निर्माता चंद्रकांत विसपुते यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून विलोभनीय सादरीकरण करणाऱ्यांना आपल्या चित्रपटांमध्ये घेण्याचे आश्वासन दिले. डॉक्टर जितेंद्र देसले यांनी कस्तुरी राईज फाउंडेशनच्या महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी पासून विविध सांस्कृतिक महोत्सवापर्यंत कस्तुरी राईजच्या कार्यक्रमाचे आणि कलाकारांना कशा पद्धतीने मदतीचा हात , व्यासपीठ या फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येतो हे स्पष्ट केले. अहिराणी व मराठी बोलीभाषेचा संवर्धन प्रचार प्रसार करणारे अभिनेते प्रवीण माळी यांनी त्यांच्या होऊ घातलेल्या 500 व्या अस्सल विनोदी प्रयोगाचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकलीत त्यांनीच या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता प्रवीण माळी यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश मानमोडे, उमा इंगळे, सुषमा कोळेकर, सोनाली कोदे., छाया भदाने, कोमल कदम, वैभव भालेराव, सौरभ पंडित यांचे विशेष योगदान राहिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश कोठीकर यांनी अध्यक्षीय भाषणात समाजसेवा करणारे कार्यकर्ते, कलाकार आणि साहित्यिक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या फाउंडेशन योग्य ते सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला. अशा संस्था ह्या सस्कृतीला जिवंत ठेवण्याचे महान सामाजिक काम करतात असे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमातील आभार प्रदर्शन अभिजीत मानमोडे यांनी व्यक्त केले.