शबनम न्यूज | चिंचवड
चिंचवड मतदार संघाच्या माजी आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या विकास निधीतुन योग प्रशिक्षण केंद्राचे भुमिपुजन नुकतेच संपन्न झाले.
मा. आमदार अश्विनी जगताप व पतंजली हरिद्वारचे स्वामी आदित्य देवजी यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक -18, चिंचवडगाव, केशवनगर,गोयल गरिमा येथील अद्यावत योग प्रशिक्षण केंद्र या इमारतीचे भुमिपुजन झाले. या प्रसंगी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर , अश्विनीताई चिंचवडे , माधुरीताई कुलकर्णी, डॉ. अजित जगताप, हिरामण भुजबळ, लक्ष्मण जोशी, गतिराम भोईर, पंजाबराव मोंढे, दीपक गावडे सुरेश आगवणे, सुभाष मालुसरे, नुतन चव्हाण, दिपाली कलापुरे, चैताली भोईर, व इतर योग साधक व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.