spot_img
spot_img
spot_img

खा. संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

शबनम न्यूज | मुंबई

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आज खासदार शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. नरकातील स्वर्ग या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपारिक निमंत्रण देण्याकरता ही भेट घेण्यात आली होती. यासंदर्भातील माहिती शरद पवारांनी समाज माध्यमांवरून दिली आहे.

शरद पवार म्हणाले, “राज्यसभेचे खासदार तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले.या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या वन्यजीवनावर आधारित पुस्तकावर सविस्तर चर्चा झाली. त्याचप्रमाणे, राज्य व देशातील विविध मुद्द्यांवरही विचारमंथन झाले. भेटीनंतर मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.”

दरम्यान, संजय राऊत लिखित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन १७ मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. या कार्यकर्माला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभेचे खासदार शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवी, गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!