spot_img
spot_img
spot_img

पुणेज ब्रदरहूड फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सागर अग्रवाल यांची निवड !

शबनम न्यूज | पुणे

अग्रवाल समाजासाठी सामाजिक, धार्मिक तथा मनोरंजनाच्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणारी पुणेज ब्रदरहुड फाउंडेशन ही पुण्याची सर्वांत मोठी संस्था आहे. तुम्हा सर्वांना एका मजबूत परिवाराप्रमाणे काम करताना पाहून मी खरंच खूप प्रभावित झालो आहे. अग्रवाल समाजाचे कुलपिता अग्रसेन महाराजांच्या विचारांवर खऱ्या अर्थाने तुमच्या संस्थेची वाटचाल सुरू आहे आणि पुढेही असंच काम करीत रहा, असे आवाहन स्टरलाईट पाॅवर कंपनी चे व्हाईस चेअरमन प्रवीण अग्रवाल यांनी केले.

पुणेज ब्रदरहूड फाउंडेशनची नवीन कार्यकारिणी नुकत्याच एका शानदार समारंभात स्थापित करण्यात आली. या वेळी प्रवीण अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. समारोहाचे अध्यक्षस्थान सोमनाथ केडिया यांनी भूषविले. समारोहात मावळते अध्यक्ष पवन चमाडिया यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सागर अग्रवाल यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली.

याशिवाय पुणेज ब्रदरहूड फाउंडेशनचे सचिव म्हणून कर्नल नरेश गोयल, कोषाध्यक्ष राजेश मित्तल, सहसचिव योगेश जैन यांची निवड करण्यात आली, तर चेयरमन ईश्वरचंद गोयल, कार्यकारी संचालक पवन बंसल, संजयकुमार अग्रवाल, आयपीपी पवनकुमार चमाडिया, उपाध्यक्ष संजय बी. अग्रवाल तथा सदस्यपदी संजय बन्सल, राहुल अग्रवाल, राकेश अग्रवाल, अरुण सिंघल, सीए संदीप अग्रवाल, नरेंद्र गोयल, प्रशांत अग्रवाल, मुकेश कनोडिया, सीए जीतेश अग्रवाल, अरविंद अग्रवाल, जितेंद्र बन्सल, अजय जिंदल, अनुप गर्ग, शैलेश अग्रवाल यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. या वेळी गीता जयप्रकाश गोयल, अतुल गोयल और अमित गोयल यांची विशेष उपस्थिती होती. गीता गोयल यांचा समारंभात विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात मंचावर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ब्रदरहुड डायरीचे विमोचन करण्यात आले. या समारंभात वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते.

अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सागर अग्रवाल यांनी माजी अध्यक्ष तथा सर्व कार्यकारिणीचे आभार प्रकट केले. ते म्हणाले की, समाजाच्या हितासाठी काम करण्याची आज माझ्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. मी या जबाबदारीचे निष्ठा व श्रद्धेने निर्वहन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, तसेच स्व. संस्थापक जयप्रकाश गोयल यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न नक्की करेन.

ईश्वरचंद गोयल म्हणाले की, एका कुटुंबाप्रमाणे ब्रदरहुड फाउंडेशन काम करीत आहे. आपसातील मजबूत ऋणानुबंध हेच आमचे वैशिष्ट्य आहे. मला आशा आहे की, नवीन कार्यकारिणी संस्थेच्या तत्वांवर काम करीत समाजासाठी सर्वोत्तम कार्य करेल.
समारंभाचे सूत्रसंचालन ज्योतिकुमार अग्रवाल आणि रितू अग्रवाल यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!