spot_img
spot_img
spot_img

चिंचवड मध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय कुणालचे नवले ब्रीजवर अपघाती निधन

चिंचवड (प्रतिनिधी) तानाजीनगर चिंचवडगाव येथील २१ वर्षीय कुणाल मनोज हुशार या तरुणा चे आज (शनिवार दिनांक ३ मे) पहाटे ३ वाजता नवले ब्रीज पुणे येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये निधन झाले असून कुटुंबामध्ये वडील मनोज, आई आणि एक जुळा भाऊ ओंकार असा परिवार आहे. कुणालचा अंत्यविधी आज सांयकाळी ५ वाजता काळेवाडी येथील स्मशानभूमीत पार पडणार आहे.

कुणाल हुशार चे बी बी ए शिक्षण थेरगांव येथील संचेती कॉलेजमध्ये सुरू होते. पार्ट टाईम मध्ये फ्लेक्सचे काम करत होता. कुणालला भजनाची खूप

आवड होती. काल रात्री कुणाल आणि त्याचा मित्र प्रज्योत दीपक पुजारी हे दोघे दोन चाकी गाडीवर स्वारगेट येथील श्री शंकर मठ येथे भजनासाठी गेले होते. भजन संपल्यानंतर दोघे ही आज पहाटे ३ वाजता चिंचवडला परत येत असताना नवले ब्रीज येथे त्यांच्या गाडीला मर्सिडीज गाडीने जोराची धडक दिल्याने कुणाल चा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र प्रज्योत पुजारी हा जखमी झाला आहे.

कुणालचा मित्र परिवार मोठा असून एक प्रामाणिक, धार्मिक आवड असणारा आणि कष्टाळू मुलगा म्हणून त्याची मित्रांमध्ये ओळख आहे. कुणालच्या जाण्याने चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त होत असून चिंचवडगाव परिसरात कुणालच्या मित्र परिवारामध्ये शोककळा पसरली आहे. 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!