spot_img
spot_img
spot_img

शिवप्रेरणेतून घडलेली सुवर्णकन्या: श्वेता-सविताराजेंद्र-लिमण यांची बहुमूल्य क्रीडा कामगिरी!

श्वेता-सविताराजेंद्र-लिमण – बहुगुणी खेळाडू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून साकारलेली लढवय्या!

पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी , शहरातील मोरेवस्ती, चिखली येथील श्वेता लिमण ही केवळ एक खेळाडू नाही, तर ती जिद्द, मेहनत, आणि समर्पणाचे सजीव उदाहरण आहे. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी तिने १७ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये झळाळती कामगिरी करून संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे.

• राज्यस्तर:
बेल्ट रेसलिंग – सुवर्ण पदक

युनिफाईट – सुवर्ण पदक

थाय बॉक्सिंग – रौप्य पदक

उल्लेखनीय क्रीडा कामगिरी:

श्वेताने विविध जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पदके पटकावली आहेत –
* प्रथम क्रमांक: थाय बॉक्सिंग, युनिफाईट, अष्टेदू आखाडा, बेल्ट रेसलिंग, वॉमिनम

* द्वितीय क्रमांक: किकबॉक्सिंग, ग्रॅपलिंग, सिलंबम

* तृतीय क्रमांक: कराटे, वुशू, बॉक्सिंग

* इतर खेळ: तायक्वांदो, जुडो, ॲथलेटिक्स, पोहणे, योगा, रिदमिक जिम्नॅस्टिक्स

या साऱ्या क्रीडा प्रकारांमध्ये ती केवळ सहभागीच झाली नाही, तर पदक जिंकून आपली बहुआयामी प्रतिभा सिद्ध केली आहे.

विभागीय व राज्यस्तरीय निवड:

* विभागीय स्तर: थाय बॉक्सिंग, युनिफाईट,बेल्ट रेसलिंग

 

श्वेताची कामगिरी पाहता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिची चमक निश्चितच पाहायला मिळणार आहे.

शस्त्रकला आणि शिवप्रेरणा:

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे श्वेतासाठी सतत प्रेरणादायी राहिले आहे. ऐतिहासिक युद्धकला, शस्त्रविद्या आणि मर्दानी खेळांमध्ये तिची विशेष रुची आहे. ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही अत्यंत सक्षम आहे.

“शारीरिक ताकद लढाई जिंकते, पण मानसिक दृढता विजयाला अजरामर करते.” या तिच्या विचारसरणीचे दर्शन तिच्या प्रत्येक कामगिरीत होते.

अतिरिक्त कौशल्ये:

श्वेता मार्शल आर्ट्स, नदी पोहणे, घोडेस्वारी, गड-किल्ले सर करणे, अग्नि खेळ, मॅरेथॉन धावणे, लांब पल्ल्याची सायकलिंग, योगा, जिम्नॅस्टिक्स आणि मल्लखांब अशा अनेकार्थाने सक्रिय आहे.

प्रशिक्षण आणि पाठिंबा:

* शाळा: सेंट पीटर्स स्कूल
* प्रशिक्षक: प्रफुल्ल प्रधान

तिच्या यशात कुटुंब आणि प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!