शबनम न्यूज | पिंपरी
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथे शहरातील विविध क्षेत्रातील कामगारांचा सत्कार करण्यात आला. फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी जी चळवळ झाली व त्यात 106 लोकांना होताम्य प्राप्त झाले त्या सर्वांना प्रथम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सलीम सय्यद यांनी प्रस्थाविक केले.
या वेळी प्रमुख पाहुणे सचिन कांबळे यांनी उपस्थित राहून कामगार दिनाचे महत्व व अन्य माहिती दिली.
ज्यांचा नेहमी समाजाला उपयोग होतो,समाजाप्रती आस्था असते,दायित्व घेतात,समाजाप्रती काहीतरी देणे आहोत अशी प्रतिमा असणारे आरोग्य,मैकेनिक,वर्कशॉप,अनाथ आश्रम,वृद्धाश्रम,इंडिस्ट्रिज,हॉस्पिटल. आदी विविध क्षेत्रातील कामगारांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्षा सोनाली मन्हास यांनी सूत्रसंचालन केले.
खजिनदार दिलीप चक्रे यांनी आभार मानले. स्वानंद राजपाठक, संतोषी कदम/पाटील,गौतम थोरात,गणेश जगताप,इजहार शेख,सचिन कांबळे ,करण कोळी,आदींचा कामगार म्हणून सत्कार करण्यात आला. अध्यक्ष मधुकर बच्चे,सल्लागार रवींद्र सागडे, उपाध्यक्ष सोनाली मन्हास सलीम सय्यद, दिलीप चक्रे, जयंत कुलकर्णी, क्रांतीकुमार कडूलकर खुशाल दुसाने, जावेद शेख, दिलीप पेटकर, मुकुंद इनामदार, सदाशिव गुरव, शंकर कुलकर्णी विलास गटने, दारासिंग मन्हास
गणेश जगताप, पाटील काका, इजहार शेख, अर्चना बच्चे,पोपट बच्चे, आदिनी कार्यक्रम यशस्वी करण्यास पुढाकार घेतला
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.