शबनम न्यूज | पिंपरी
राजगृह लोकोत्तर बुद्धीस्ट धम्म विनय ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दहा दिवसीय श्रामनेरी दिक्षा व बौध्द धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे…
बुद्धभूषण सेवा संघ बुद्ध विहार, पिंपळे गुरव या ठिकाणी आयोजित या शिबिराचे उद्घाटन पूज्य भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो यांच्या हस्ते रविवारी, दिनांक 4 मे रोजी या होणार असून शिबिराची सांगता बुधवार, दिनांक 14 मे रोजी दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते डॉ. रोहित पिसाळ यांच्या उपस्थितीत पिंपळे गुरव येथील निळू फुले सभागृहात होणार आहे.
बुद्धाचा धम्म हा स्त्री व पुरुष यांच्यातील समता मानणारा असुन पुरुष श्रामनेराच्या तुलनेत महिला श्रामनेरी देखील तयार होणे गरजेचे असुन दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरा साठी एकूण 50 महिला व स्त्रियांनी नाव नोंदणी केलेली आहे सदर शिबिरामध्ये निमंत्रित असे पू. भंते ज्यामध्ये डॉ. इंदवंश महाथेरो, डॉ. हर्षबोधी महाथेरो यांच्या सह इतरही पूज्य भंते बौद्ध धम्म संस्कार, प्रसार, प्रचार व तत्वज्ञान यासंबंधी सखोल मार्गदर्शन व उपदेश करणार असुन तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अहिंसा, करुणा, शांती व मैत्री भावनेचे तत्व सहभागी महिला शिबिरार्थीनमध्ये रुजबणार असल्याची माहिती मुख्य आयोजक तथा राजगृह लोकोत्तर बुद्धीस्ट धम्म विनय ट्रस्टच्या अध्यक्षा श्रामनेरी राजश्री जाधव यांनी दिली तसेच श्रद्धावान उपासक व उपासिका यांनी पुढे येऊन सदर शिबिरामध्ये सेवा, समर्पण भावनेने तन मन व धनाने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.