शबनम न्यूज | भोसरी
एमआयडीसी येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या हस्ते एमआयडीसीतील कामगार बंधूंचे सन्मान करण्यात आले आणि पेढे वाटून महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी एमआयडीसीतील कामगारांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्त्व सांगण्यात आले आणि एक मे हा कामगार दिन प्रत्येक कामगाराने उत्साहात साजरा केला पाहिजे, आज देशात प्रत्येक क्षेत्रात कामगाराचे योगदान मोठे आहे तसेच येणाऱ्या आधुनिकरणामध्ये कामगारांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कुशल होणे गरजेचे असून आधुनिक तंत्रज्ञानाला सामोरे जावे लागणार आहे. त्याची तयारी करावी जेणेकरून कोणत्याही कामगारावर नोकरी जाण्याची वेळ येणार नाही आणि आधुनिकरण मध्ये कामगार टिकाऊ धरू शकतील कामगारांनी आपले आरोग्य हे जपलेच पाहिजे.
तसेच कंपन्यांनी प्रत्येक कामगाराचा विमा देखील काढला पाहिजे जेणेकरून पुढील काळामध्ये कामगाराला त्याची मदत होऊ शकेल एमआयडीसी क्षेत्रामध्ये अनेक परराज्यातील कामगार काम करत आहेत परंतु महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्त्व अद्याप अनेक कामगारांना माहीत नाही याची जनजागृती झाली पाहिजे आणि प्रत्येक कामगारापर्यंत या दिवसाच्या महत्त्व पोहोचविने गरजेचे आहे यावेळी कामगारांमध्ये खूप मोठा उत्साह दिसून आला आणि वातावरण निर्माण झाले.