- सातत्यपूर्ण वाढ आणि स्थैर्य, एकूण विक्री ५९५ कोटीवर
शबनम न्यूज | पुणे
जगातील आघाडीच्या पंप, व्हाॅल्व्हज आणि प्रणाली पुरवठादार कंपन्यांपैकी एक असलेल्या केएसबी लिमिटेडने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून, हे निकाल सातत्यपूर्ण वाढ आणि स्थैर्याच्या दृष्टीने उल्लेखनीय ठरले आहेत.
केएसबी लिमिटेडने २०२५ च्या पहिल्या तिमाहीत भक्कम आर्थिक कामगिरी करत स्थैर्य आणि सातत्यपूर्ण वृद्धी दाखवली आहे. कंपनीची एकूण विक्री ५९५ कोटी रुपये झाली असून, २०२४ च्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यात ९.४ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. ऑपरेटिंग नफा मार्जिन ११.४ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे, ज्यामुळे कंपनीच्या प्रभावी व्यवस्थापन क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
या तिमाहीत कंपनीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण असे यश संपादन केले आहे. ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’अंतर्गत (घटक बी) त्यांना काम मंजुरी पत्र प्राप्त झाले आहे. त्रिपुरा अक्षय ऊर्जा विकास संस्थेने केएसबीला सुमारे १४ कोटी (१.४७ मिलियन युरो) किंमतीचे ९६२ सौर जलपंप प्रणाली पुरवठ्याचे काम दिले आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत सुमारे ₹४९ कोटी (५.१६ मिलियन युरो) किंमतीचे २००० सौर पंप पुरवठ्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.
या काळात कंपनीने अॅक्च्युएटेड व्हॉल्व्हसाठी महत्त्वाच्या निर्यात ऑर्डर यशस्वीरित्या पूर्ण केल्या असून, केएसबीचा गुणवत्ता आणि विश्वासार्हतेचा वारसा जागतिक बाजारात अधोरेखित केला आहे. याशिवाय, उत्तर आणि पूर्व भारतात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी कंपनीने खास टीव्ही जाहिरात कॅम्पेन राबवली, ज्यातून सर्व ग्राहक गटांमध्ये केएसबीची पंप सोल्यूशन्स क्षेत्रामध्ये आघाडीचे स्थान प्राप्त केले आहे.
२०२५ च्या पहिल्या तिमाहीतील ही कामगिरी केएसबी लिमिटेडच्या धोरणात्मक दृष्टिकोनाची आणि ग्राहककेंद्रिततेची साक्ष देते. कंपनीने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली उपस्थिती अधिक बळकट केली असून, आगामी काळातही विश्वास आणि कार्यक्षमतेच्या आधारावर प्रगतीचा प्रवास सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
KSB लिमिटेडचे विक्री आणि विपणन उपाध्यक्ष श्री. प्रशांत कुमार 2025 सालच्या पहिल्या तिमाहितीतील कामगिरीविषयी म्हणाले, “या तिमाहीत, आम्ही विक्री महसुलात ९.४% वाढ नोंदवली आहे, जी २०२४ च्या याच तिमाहीच्या तुलनेत मोठी प्रगती केली आहे. सौर विभागाने चांगली कामगिरी केली असून, PM-KUSUM योजनेअंतर्गत विविध ऑर्डर्सने त्याला चालना दिली आहे. आम्ही घरगुती, इमारत, आणि जल व गटजल (WWW) विभागांमध्येही मजबूत प्रगती करीत आहोत.
तसेच, आम्ही एशिया वेस्ट डिलर काॅन्फरन्सचे गोव्यात आयोजन केले होते. त्यात १०० हून अधिक वितरक एकत्र आले. या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित केले आणि २०२५ साठी आमच्या भविष्यकालीन योजनांची चर्चा केली.
या दमदार प्रारंभासह, केएसबी अत्युत्तम कार्यक्षमता, टिकाऊपणाच्या प्रगतीला प्रोत्साहन देत आणि सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
KSB लिमिटेडबद्दल: KSB लिमिटेडची स्थापना १९६० मध्ये भारतात झाली आणि ही KSB SE & Co KGaA चा भाग आहे, जो जगातील आघाडीचे पंप, वाल्व्ह आणि सिस्टीम पुरवठादार आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट सेवेसोबत, कंपनीने भारतीय ग्राहकांच्या विविध गरजांसाठी पंप, जल शुद्धीकरण, जल परिवहन, ऊर्जा, तेल, इमारत सेवा, प्रक्रिया अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण आणि मजबूत उपाय प्रदान केले आहेत. आज केएसबी समूहाचे जगभरात असंख्य विक्री आणि विपणन कंपन्या, उत्पादन सुविधा आणि सेवा ऑपरेशन्स आहेत. १५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वार्षिक विक्री महसूल दोन अब्ज युरोच्या वर पोहोचलेला आहे.