spot_img
spot_img
spot_img

आकुर्डीतील रहदारीचा रस्ता केला बंद ; मा. नगरसेवक प्रमोद कुटे ऑन द स्पॉट

शबनम न्यूज | पिंपरी

आकुर्डीतील विठ्ठलवाडी येथील श्रीकृष्णनगरवरुन क्रांतीनगरकडे जाणारा मुख्य रस्ता दातीर कुटुंबाने अचानक १ मे पासून रस्ता बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण झाली असून स्थानिक माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी तत्काळ तिथे धाव घेतली. महापालिका अधिका-यांना बोलावून घेऊन रस्ता रहदारीस खुला करण्याची मागणी केली. लवकरात लवकर रस्ता खुला न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा कुटे यांनी दिला आहे.

याबाबतची माहिती अशी की, आकुर्डीत दाट लोकवस्ती आहे. विठ्ठलवाडी येथील श्रीकृष्णनगरवरुन क्रांतीनगरकडे जाणारा एक मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर सन १९९८ मध्ये डांबरीकरण झाले आहे. महापालिकेकडून रस्त्याची देखभाल दुरुस्ती केली जाते. हजारो लोक या रस्त्यावरुन ये-जा करतात. तीन ते चार हजार कुटुंब या रस्त्याचा वापर करतात. या भागात मंदिर, मस्जिद आहे. अतिशय रहदारीचा आणि वर्दळीचा हा रस्ता आहे. असे असताना म्हातोबा दातीर आणि त्यांच्या कुटुंबाने अचानक १ मे पासून रस्ता बंद केला. अनधिकृतपणे रस्त्यावरील डांबर उखडले, रस्ता खोदला. जाळी टाकून रहदारीसाठी रस्ता बंद केला आहे. आम्हाला विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) मिळावा अशी दातीर कुटुंबाची मागणी आहे. २७ वर्षांनी टीडीआरची मागणी करित रस्ता बंद केल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.

याबाबत नागरिकांनी स्थानिक माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांना संपर्क साधला. कुटे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महापालिका अधिका-यांशी संपर्क साधला. अधिका-यांना घटनास्थळी बोलावून घेतले. आडमुठेपणाची भूमिका घेत रहदारीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. यातून लवकरात लवकर तोडगा काढावा. रस्ता तत्काळ रहदारीसाठी खुला करावा अशी मागणी केली आहे. दोन दिवसात रस्ता खुला न झाल्यास आंदोलनाचा इशारा कुटे यांनी दिला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!