spot_img
spot_img
spot_img

गणेशमूर्ती निर्मितीसाठी मृदापूजन सोहळा थाटात संपन्न

शबनम न्यूज | पुणे

संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नुकतेच आपल्या लाडक्या “श्रीं” ची मूर्ती घडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मृदेचे पूजन अत्यंत श्रद्धा व भक्तीभावाने संपन्न झाले.

हा सोहळा रास्ता पेठेतील मूर्तिकार श्री. अभिजीत धोंडफळे यांच्या स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला होता. पूजनकार्य मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत शेटे यांच्या हस्ते तसेच उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

मूर्ती घडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मृदेचे विधिवत पूजन करण्यात आले. मंत्रोच्चार व भक्तिपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी श्रींच्या आगमनाची चाहूल सर्वत्र जाणवली आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले.

हा पवित्र सोहळा मोठ्या भक्तीभावाने पार पडताच सर्वांनी एकमुखाने जयघोष केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!