spot_img
spot_img
spot_img

आता उद्यानांमध्ये पहिल्यांदाच होणार कॅशलेस प्रवेश!

  • १० उद्यानांमध्ये पीओएस मशिन्स कार्यान्वित

शबनम न्यूज | पिंपरी

कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील १० लोकप्रिय उद्यान आणि इतर सुविधांमध्ये एकूण १३ पॉइंट-ऑफ-सेल म्हणजेच पीओएस मशिन्सची व्यवस्था केली आहे.

पीसीएमसीच्या उद्यानांमध्ये पहिल्यांदाच पीओएस मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. यापूर्वी प्रवेश शुल्कासाठी फक्त रोख व्यवहार स्वीकारले जात होते. आता या नव्या प्रणालीमुळे नागरिक पीओएस मशिनद्वारे प्रवेश शुल्क भरणार असून, प्रत्येक व्यवहारासाठी एक प्रत्येक व्यवहारासाठी एक नवीन डायनॅमिक क्यूआर कोड तयार होईल. त्यामुळे प्रत्येक पेमेंटची नोंद राहील आणि व्यवहार पारदर्शक होतील.

या उपक्रमाविषयी बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, उद्यानांमध्ये पीओएस मशिन्सचा वापर सुरू केल्यामुळे आम्ही अधिक पारदर्शक आणि जबाबदार प्रणाली निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. प्रत्येक व्यवहाराचा डिजिटल ठसा राहिल्याने नागरिकांचा विश्वास वाढेल आणि त्यांना अधिक सोय होईल. उद्यान विभागाचे सहायक आयुक्त उमेश ढाकणे म्हणाले, पीओएस आधारित कॅशलेस प्रणालीमुळे कामकाजात सुसूत्रता येईल आणि उद्यानांच्या प्रवेश व्यवहारांचे अधिकबी प्रभावीपणे निरीक्षण आणि लेखापरीक्षण करता येईल. ही आपल्या सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक मोठी झेप आहे.

सदर पीओएस मशिन्स भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान (२ मशिन्स), राजमाता जिजाऊ उद्यान (डायनासोर गार्डन) (२ मशिन्स), दुर्गादेवी उद्यान (१ मशिन), वीर सावरकर उद्यान (१ मशिन), बर्ड व्हॅली उद्यान (१ मशिन), ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान (१ मशिन), भोसरी सहल केंद्र (१ मशिन), थेरगाव बोट क्लब (१ मशिन), गुलाब पुष्प उद्यान (ऑफिस – १, नेहरूनगर – १), सेंट्रल नर्सरी (१ मशिन) याठिकाणी बसवण्यात आल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!