spot_img
spot_img
spot_img

वाढदिवस समाजोपयोगी; शंकरभाऊ जगताप मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असून, त्याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेला प्राधान्य देणारा एक स्तुत्य उपक्रम पार पडला.

शंकरभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छ व सन्मानपूर्वक माध्यान्ह भोजन मिळावे, या उद्देशाने प्लेट्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय रुजण्यास मदत होणार असून त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे.

चिंचवड प्रभागातील नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या हस्ते हा वितरण सोहळा पार पडला. हुतात्मा चापेकर प्राथमिक विद्या मंदिर तसेच केशवनगर प्राथमिक शाळा, चिंचवड येथील विद्यार्थ्यांना प्लेट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरत असून, सामाजिक बांधिलकी जपणारा हा प्रयत्न सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!