spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत मोकळ्या मैदानात तीनपत्ती जुगारावर पोलिसांची धाड; सात जणांवर गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात मोकळ्या मैदानात सुरू असलेल्या तीनपत्ती जुगारावर पोलिसांनी धाड टाकत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपी सध्या फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नविन फुलेनगर पत्राशेड परिसरातील मोकळ्या मैदानात काही जण पैशावर तीनपत्ती जुगार खेळत असल्याची माहिती संत तुकारामनगर पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता प्रतिक बगाटे, अमित गायकवाड, किरण कांबळे, पंकज ओव्हाळ, दत्ता हजारे, रोहित शिंदे व सुरज घोडके हे जण आर्थिक फायद्यासाठी एकत्र येऊन जुगार खेळताना आढळून आले.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार जठर करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!