spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे नियंत्रणासाठी ५ नव्या पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब

शहरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक व आयटी क्षेत्राचा विस्तार आणि भौगोलिक वाढ लक्षात घेता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे.

या प्रस्तावामध्ये पाच नवीन पोलीस ठाण्यांची स्थापना तसेच स्वतंत्र ‘झोन ४’ निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार यांनी सादर केलेल्या या प्रस्तावात शहराच्या बदलत्या रचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.

सध्या आयुक्तालयाच्या अखत्यारीत १८ पोलीस ठाणे आणि २ विभाग (सर्कल) कार्यरत आहेत. मात्र नागरिकांना पोलीस मदतीसाठी मोठे अंतर पार करावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही अडचण दूर करण्यासाठी पिरंगुट,जांबे, पिंपळे सौदागर, मोशी, देहूगाव या भागांमध्ये नवीन पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

या नव्या ठाण्यांमुळे पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद वेळ कमी होऊन गुन्हेगारीवर तत्काळ नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

तसेच, प्रस्तावित ‘झोन ४’साठी एकूण ३३ नव्या पदांची मागणी करण्यात आली असून, त्यामध्ये स्वतंत्र उपायुक्त (DCP) पदासह आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पाचही नवीन पोलीस ठाण्यांसाठी एकूण ९१३ नवीन पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.

प्रत्येक ठाण्यासाठी सुमारे १०० ते १६० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सध्या हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, मंजुरीनंतर पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षा व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!