spot_img
spot_img
spot_img

सिगारेट न दिल्याच्या कारणावरून किराणा दुकानदारावर कोयत्याने हल्ला; दोघे आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

चिंचवड परिसरात किरकोळ कारणावरून किराणा दुकानदारावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिगारेट न दिल्याच्या रागातून तिघांनी दुकानदाराला मारहाण करत कोयत्याने वार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील म्हसोबा मंदिराजवळ, लिंक रोडवरील करिष्मा प्रोव्हिजन जनरल स्टोअर्ससमोर घडली.

या प्रकरणी दुकानदार विकास अरुण झिंजाडे (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी उदल उर्फ चिकन्या हरिचंद वाल्मिकी (वय ४०), आदित्य उर्फ लाल्या किसन जाधव (वय ३२) आणि अजित उर्फ मद्री रामा पवार (वय ३२) (सर्व रा. पत्रा शेड, लिंक रोड, चिंचवड) यांनी हल्ला केला.

घटनेच्या वेळी आरोपींनी दुकानासमोर येत सिगारेटची मागणी केली. मात्र दुकान बंद असल्याने चावी नसल्याचे फिर्यादीने सांगितल्यावर आरोपी संतापले. त्यांनी शिवीगाळ करत झिंजाडे यांना मारहाण केली. यावेळी आरोपी उदल वाल्मिकी याने त्याच्याकडील लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर वार करत गंभीर जखमी केले.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी आदित्य जाधव आणि अजित पवार यांना अटक केली असून मुख्य आरोपी उदल वाल्मिकी फरार आहे.

या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ११५ (२), ३५२, ३ (५), तसेच भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुगरे करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!