आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पाठपुराव्याला यश
शबनम न्यूज | प्रतिनिधी
शास्त्री नगर परिसरातील निसर्ग कॉलनीमध्ये अनेक दिवसांपासून रखडलेले ड्रेनेज लाईन व डांबरीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले असून स्थानिक रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली असून नागरिकांची दीर्घकालीन समस्या मार्गी लागण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.
या कामाच्या शुभारंभ प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विनोद तापकीर, स्थापत्य विभागाच्या उपअभियंता वंदना मोरे, कनिष्ठ अभियंता अमित पवार, राम नखाते, दिनेश चिकणे, विजय कदम, अक्षय बावणे, धोंडीराम मनवे, राजेंद्र पवार, वैजयंती जागडे, संगीता नखाते, लक्ष्मी चिकणे, अश्विनी चिकणे तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी केलेला हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून भविष्यातही अशा विकासकामांना प्राधान्य दिले जाईल.



