spot_img
spot_img
spot_img

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

शबनम न्यूज | पिंपरी

भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना ८ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मोशी टोलनाका येथे घडली.

सुभाष शंभुनाथ रॉय (वय ५४, रा. साने चौक, चिखली) असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून, त्यांनी शुक्रवारी (दि. २५) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या कारवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी सुभाष हे मोशी टोलनाका येथून चालले होते. ते पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी वळण घेत असताना चाकणकडून मोशीच्या दिशेने येणाऱ्या संशयिताच्या कारने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!