spot_img
spot_img
spot_img

स्वातंत्र्यसेनानी अब्बास इनामदार यांचे निधन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

स्वातंत्र्यसेनानी अब्बास अब्दुल इनामदार (वय ९८) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (३१ मार्च) सायंकाळी साडेसात वाजता पिंपरीतील नेहरूनगर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी अक्सादी इनामदार, चार मुले, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

बुधवारी दुपारी दोन वाजता नेहरूनगर येथील दफनभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला. यावेळी तहसीलदार मनीषा माने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या मानवंदना देण्यात आली. वतीने

इनामदार यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी असून, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच गोवा मुक्तीसंग्रामात त्यांनी योगदान दिले होते. गेल्या ५० वर्षांपासून ते पिंपरी-चिंचवड शहरातील नेहरूनगर परिसरात वास्तव्यास होते.

त्यांच्या निधनाने समाजातील ज्येष्ठ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केलीजात आहे

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!