spot_img
spot_img
spot_img

हिंजवडीत एमडी ड्रग्स तस्करीचा भंडाफोड; दोन आरोपी जेरबंद, 27.55 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

हिंजवडी परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी येणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ससह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 27 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्हे शोध पथकाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील ड्रग्स रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एक इसम चारचाकी वाहनातून एमडी अंमली पदार्थ विक्रीसाठी वाकड परिसरातील विनोदे वस्ती येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अतुल शंकर बालगुडे (वय ३५, रा. पाथरगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे असून, त्याच्या ताब्यातून ४२ ग्रॅम एमडी ड्रग्स (किंमत ४.२० लाख रुपये) तसेच ३.२४ लाख रुपये किंमतीची चारचाकी गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान या प्रकरणातील आणखी एक साथीदार शाहरुख उर्फ सद्दाम इक्बाल अन्सारी (रा. गोवंडी, मुंबई) यालाही मुंबईतून अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून २०० ग्रॅम एमडी ड्रग्स (किंमत २० लाख रुपये) जप्त करण्यात आले.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व गुन्हे शोध पथकाने संयुक्तपणे केली. ड्रग्सविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!