spot_img
spot_img
spot_img

कुदळवाडीत भव्य डे-नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; आझमी स्पोर्ट्स क्लब विजेता

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी येथे कुदळवाडी स्पोर्टस् क्लब व शिवप्रसाद बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य डे-नाईट ऑल इंडिया व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात पार पडली. दि. २७ मार्च ते २९ मार्च दरम्यान रंगलेल्या या स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला.

स्पर्धेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी पोलीस, राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. संपूर्ण भारतातून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी झाल्याने स्पर्धेची रंगत अधिकच वाढली.

या स्पर्धेत एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये खान स्पोर्ट्स क्लब, रेहमानी स्पोर्ट्स क्लब, आझमी स्पोर्ट्स क्लब, शाह स्पोर्ट्स क्लब, गुप्ता स्पोर्ट्स क्लब, ABK फायटर, चौधरी स्पोर्ट्स क्लब आणि स्टार स्पोर्ट्स क्लब यांचा समावेश होता.

अंतिम सामना आझमी स्पोर्ट्स क्लब आणि ABK फायटर यांच्यात रंगला. अत्यंत दमदार खेळ करत आझमी स्पोर्ट्स क्लबने प्रतिस्पर्ध्यांवर ३-० असा सरळ विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परवेज सिध्दीकी, प्रविण मौर्या, खैरु चौधरी, मुज्जफ्फर सिध्दीकी, अनिल यादव, संभाजी यादव, साहेबअली रहमानी, साजिद सिद्दिकी, गुलजार सिद्दिकी, इसरार रेहमानी, इजहार रेहमानी, अशफाक सिध्दीकी, मनोज गुप्ता, जमीर चौधरी, एजाज चौधरी, वहीद खान आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाकिबभाई खान आणि दत्ताभाऊ यादव यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!