शबनम न्यूज | प्रतिनिधी
१ एप्रिलपासून देशभरात विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत. डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी केवळ OTPवर व्यवहार करता येणार नसून, प्रत्येक व्यवहारासाठी PIN/पासवर्ड, नोंदणीकृत डिव्हाइस, फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी यापैकी कोणत्याही दोन घटकांची आवश्यकता असणार आहे.
याशिवाय, सर्व पेट्रोल पंपांवर E20 पेट्रोल उपलब्ध ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, ज्या FASTag खात्यांचे KYC पूर्ण झालेले नाही, ती खाती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, काही बँकांनी डेबिट कार्डवरील हँडलिंग शुल्कात वाढ केली असून, याचा परिणाम ग्राहकांच्या खर्चावर होण्याची शक्यता आहे.



