spot_img
spot_img
spot_img

नवे लेबर कोड लागू; कामाचे तास, ओव्हरटाईम व नियमांमध्ये मोठे बदल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

देशात आजपासून नवे लेबर कोड लागू करण्यात आले असून कामगारांसाठी महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. नव्या नियमांनुसार दिवसाला ८ तास आणि आठवड्याला ४८ तास काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच, ओव्हरटाईम केल्यास अतिरिक्त मोबदला देणे नियोक्त्यांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. महिलांना आता रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्यास परवानगी देण्यात आली असून यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची जबाबदारी कंपन्यांवर असेल.

याशिवाय, ४० वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणीची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या लेबर कोडमुळे कामगारांच्या हक्कांमध्ये सुधारणा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!