spot_img
spot_img
spot_img

रस्त्याकडेला हातचलाखीने जुगार; चाकणमध्ये दोन जणांवर कारवाई

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

चाकण परिसरात रस्त्याच्या कडेला हातचलाखीच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करत जुगार खेळवणाऱ्या दोन जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.५८ वाजण्याच्या सुमारास चाकण–तळेगाव रोडवरील तळेगाव चौक, नाणेकरवाडी परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली. आरोपी वाल्मिक पुंडलिक लांजेवार (वय २९) व जीवन बळीराम राठोड (वय २४) हे रस्त्याच्या कडेला लोकांना पत्त्यांवर आकडे लिहून हातचलाखीने लपवून दिशाभूल करत जुगार खेळवत असल्याचे आढळले.

हे आरोपी नागरिकांना आमिष दाखवून पैसे उकळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपींकडून जुगाराचे साहित्य व ३,२०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना नोटीस देण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस शिपाई निखिल वर्षे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास सपोफौज मोरे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!