spot_img
spot_img
spot_img

डिलक्स मॉलमध्ये बनावट ‘Xiaomi’ अॅक्सेसरीजचा भंडाफोड; आठ दुकानदारांवर गुन्हा

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : युनूस खतीब) 

पिंपरीतील डिलक्स मॉलमध्ये बनावट मोबाईल अॅक्सेसरीज विक्रीचा मोठा रॅकेट उघडकीस आले असून, नामांकित Xiaomi Technology Private Limited कंपनीच्या नावाने बनावट माल विकणाऱ्या आठ दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सायं. ५.०५ वाजता डिलक्स मॉल, पिंपरी येथील पहिला व दुसरा मजला येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट मोबाईल अॅक्सेसरीज जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी दि. ३० मार्च २०२६ रोजी पहाटे ३.१४ वाजता पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणी विनोद बिजल सुमरा (वय ४९, फिल्ड ऑफिसर, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

तपासात आरोपींनी त्यांच्या दुकानांमध्ये कंपनीची परवानगी न घेता डिस्प्ले, मोबाईल कव्हर, चार्जर यांसारखी बनावट उत्पादने विक्रीस ठेवली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ₹१३.४८ लाख किमतीचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी सावलाराम चौधरी, जेपाराम चौधरी, हरिष माली, प्रविण राजपुरोहित, भरत प्रजापती, मुकेश चौधरी, खेसाराम प्रजापती आणि रतनसिंग राजपुरोहित यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सर्व आरोपींना नोटीस बजावण्यात आली असून अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणी कॉपीराईट अॅक्ट १९५६ कलम ५१, ६३, ६४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दलालवाड करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!