spot_img
spot_img
spot_img

खोट्या सह्या करून मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न; दिघीत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : युनूस खतीब)

दिघी परिसरातील वडमुखवाडी येथे मालमत्ता बळकावण्याच्या उद्देशाने खोटे दस्तऐवज तयार करून शासकीय कार्यालयात सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार दि. ३० ऑगस्ट २०१९ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मौजे वडमुखवाडी, चऱ्होली बु., ता. हवेली, जि. पुणे येथील गट क्रमांक १४९/२, १४९/४, १४९/७ या ठिकाणी घडला. याप्रकरणी दि. ३० मार्च २०२६ रोजी सायं. ४.५८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी पार्वती बाळासाहेब कोरडे (वय ६५, रा. वडमुखवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून त्यांच्या तसेच त्यांच्या पतींच्या खोट्या व बनावट सह्या करून मालमत्तेवरील हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला.

आरोपींमध्ये विजया पांडुरंग कोरडे (७५), संपत पांडुरंग कोरडे (५८), बाई पांडुरंग कोरडे (५०), ज्ञानेश्वर कुशाबा कोरडे (६९), सोमनाथ बाळासाहेब कोरडे (४१) आणि सुनिता संतोष दळवी (४३) यांचा समावेश आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

तक्रारीनुसार, आरोपींनी बनावट सह्यांच्या आधारे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नगररचना विभागाकडे “ना हरकत” दाखवणारे बनावट दस्तऐवज सादर केले. या दस्तऐवजांच्या आधारे संबंधित मालमत्तेवरील हॉस्पिटल आरक्षणात फेरबदल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम ४६५, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गपाट करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!