spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे मार्च २०२६ अखेर एकूण २६ कर्मचारी सेवानिवृत्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यात सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. कोणत्याही पदावर कार्य केले असले तरी प्रत्येक कर्मचाऱ्याचा अनुभव, त्यांची कार्यनिष्ठा आणि जबाबदारीची जाणीव यामुळेच महापालिकेला आज नावलौकिक प्राप्त झाला आहे. सेवानिवृत्ती हा शेवट नसून आयुष्याचा एक नवा टप्पा आहे. या काळात आपण आपल्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवावा, आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपल्या आवडी-निवडी, छंद जोपासत आनंदी व समाधानकारक आयुष्य जगावे, असे प्रतिपादन सह आयुक्त मनोज लोणकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात माहे मार्च २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या २३ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ३ अशा एकूण २६ कर्मचाऱ्यांचा सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, उप आयुक्त संदीप खोत, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य लिपिक माया वाकडे तसेच सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालय अधिक्षक चंद्रकांत हुच्चे, विजय आभाणे, उज्वला म्हाब्दी, लेखापाल शुभांगी साळी, मुख्य लिपिक कैलास बाणेकर, रामचंद्र कांबळे, मुख्याध्यापक ज्योत्स्ना चौधरी, लॅब टेक्निशियन उर्मिला काळे, आरेखक नंदकुमार भोकरे, उपशिक्षिका स्वाती पडवळ, सुनिल लांघी, वॉर्ड बॉय बळवंत सोनवणे, शिपाई बापूराव कांबळे, लतीका गावडे, मारूती फडके, चंद्रकांत हगवणे, मजूर मनोहर गायकवाड, विजय पाटील, रखवालदार फ्रान्सिस खरात, सफाई कामगार भिमराज पवार, दिनकर भंडगे, सफाई सेवक विकास जगताप, गटरकुली रोहिदास गेंगजे यांचा समावेश आहे.

तर स्वेच्छा सेवानिवृत्त घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मुख्याध्यापक मंगल आल्हाट, ए. एन. एम सुप्रिया पवार, मुकादम शिवाजी गावडे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!