spot_img
spot_img
spot_img

“आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना महापालिकेत थेट नोकरी द्या” ; अरुण पाडुळे यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत शहराचे नाव उज्ज्वल करत आहेत. मात्र, त्यांच्या या कर्तृत्वाला योग्य संधी आणि आधार मिळावा यासाठी आता ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

भाजपाचे क्रीडा शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांनी आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत थेट नोकरी नियुक्ती देण्याची ठाम मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी क्रीडा सभापतींकडे निवेदन सादर करत खेळाडूंच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवल्या.

पाडुळे यांनी सांगितले की, शहरातील अनेक खेळाडू मर्यादित साधनसामग्रीत आणि आर्थिक अडचणींवर मात करत मोठ्या जिद्दीने यश संपादन करत आहेत. जर त्यांना योग्य सुविधा, आर्थिक पाठबळ आणि संधी मिळाली, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव अधिक उंचावू शकतात.

निवेदनात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना शिष्यवृत्ती योजना, अत्याधुनिक क्रीडा साहित्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. “खेळाडूंना सक्षम करणे म्हणजे देशाच्या भविष्यात गुंतवणूक करणे,” असेही पाडुळे यांनी नमूद केले.

या वेळी क्रीडा सभापती कैलासभाऊ कुटे, नगरसेवक कुंदनभाऊ गायकवाड, योगेशभाऊ लांडगे, उदयभाऊ गायकवाड, शामभाऊ जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!