spot_img
spot_img
spot_img

ॲड. प्रार्थना सदावर्ते, डॉ. आदित्य केळकर यांना ‘विश्वबंधुता दर्पण पुरस्कार’ जाहीर

प्रकाश रोकडे यांची माहिती; बारा एप्रिलला पुण्यात होणार वितरण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा ‘विश्वबंधुता दर्पण पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ साहित्यिक अ‍ॅड. प्रार्थना सदावर्ते आणि प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. आदित्य केळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच संस्थेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील महा‌त्मा फुले महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रग्रंथ संविधान, तिरंगा महावस्त्र, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. येत्या १२ एप्रिल २०२६ रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित २८ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनामध्ये या पुरस्काराचे होईल, अशी माहिती संमेलनाध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.

विश्वबंधुता साहित्य परिषद, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन या संस्थांच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उद्‌घाटन सकाळी दहा वाजता पूर्वाध्यक्ष प्रा. सुभाष वारे यांच्या हस्ते होईल. प्रसंगी कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. मनीषा बोरा, स्वागताध्यक्ष प्रा. शरयू पवार, निमंत्रक मंदाकिनी रोकडे, डॉ. अरुण आंधळे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्रा. शंकर आथरे यांची उपस्थिती राहील, असे रोकडे यांनी सांगितले.

दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवी विनोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ‘वंदे संविधान’ काव्यसंमेलन होईल. त्यामध्ये संगीता झिंजुरके, डॉ. अशोककुमार पगारिया यांच्यासह महाराष्ट्रातील तीस नामांकित कवी सहभागी होतील. पुरस्कार वितरणाने संमेलनाचा समारोप होईल. संमेलनामध्ये विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या दूरदर्शी, पारदर्शी, सर्वस्पर्शी, बंधुतादर्शी आणि मानवतादर्शी निवडक मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येईल. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रा. भारती जाधव, सीमा गांधी, विद्या अटक, प्रा. सायकी गोसावी, तुकाराम कांबळे, सुनील बोरसे, डॉ. बंडोपेत कांबळे, डॉ. सविता पाटील आणि प्रा. प्रशांत रोकडे यांनी विशेष पुढाकार घेतला, असल्याचेही त्यांनी नमूद केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!