spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये महिला शक्तीचा जल्लोष; सांस्कृतिक कार्यक्रमासह सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आधार महिला मंडळ व कैलासवासी कैलास भाऊ चांदगुडे प्रतिष्ठान, शाहूनगर यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व महिला सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नगरसेविका सुप्रियाताई महेश चांदगुडे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाने महिला शक्तीचा उत्सवच साजरा झाला.

शाहूनगर, संभाजीनगर, शिवतेजनगर, मोरवाडी आदी विविध भागांतून मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात नृत्य, एकपात्री नाट्य, भारुड, गायन अशा विविध कलाविष्कारांनी महिलांनी आपले बहुमुखी कौशल्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. आकर्षक वेशभूषा आणि रंगतदार सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात आलेली ‘मानाची पैठणी’. या उपक्रमामुळे महिलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये माजी आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, विधान परिषदेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या पत्नी प्रियाताई बनसोडे, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी नगरसेविका श्रद्धाताई लांडगे, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेवक कुशागर कदम यांच्यासह अनेक महिला व पुरुष लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच आधार महिला मंडळाचे मार्गदर्शक व माजी नगरसेवक महेश चांदगुडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे नियोजन आधार महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्या व सदस्यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले. संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.

नगरसेविका सुप्रियाताई महेश चांदगुडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करत कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आणि सहभागी महिलांचे आभार मानले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना आपले कलागुण सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले, तसेच महिला सक्षमीकरणाचा संदेशही प्रभावीपणे समाजात पोहोचला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!