पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
थेरगाव परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वाकड पोलिसांनी कारवाई करत एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास डांगे चौकाजवळ ताथवडे बाजूकडून येणाऱ्या रस्त्यालगत आरोपी महिला (वय ३५, रा. थेरगाव) ही ‘सोरट’ नावाचा जुगार खेळवत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी छापा टाकून तिला ताब्यात घेतले.
सदर कारवाईत सुमारे ३५० रुपयांचा जुगार साहित्य जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.



