पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
महाळुंगे इंगळे परिसरात भाडेकरूची माहिती पोलिसांना न देता बेकायदेशीररित्या परदेशी नागरिकास राहण्यास दिल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी घरमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमती सुरेखा लक्ष्मीकांत कांबळे (रा. सध्या नानापेठ, पुणे) यांनी महाळुंगे इंगळे येथील त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना त्याची माहिती पोलीस स्टेशनमध्ये सादर करणे बंधनकारक असतानाही जाणीवपूर्वक ती दिली नाही.
तपासादरम्यान त्यांच्या घरात इद्रीस गाझी (वय २८) हा बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले. यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कारोटे करीत आहेत.



