spot_img
spot_img
spot_img

तळेगावात लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू; सोसायटी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

तळेगाव दाभाडे येथील निसर्ग हौसिंग सोसायटीत लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता दिनेश सुरंगे हे कामावर जाण्यासाठी लिफ्टने खाली जात असताना सहाव्या व सातव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना लिफ्टचा दोर तुटून लिफ्ट खाली कोसळली. या अपघातात दिनेश सुरंगे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तळेगाव येथील अथर्व हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेत सोसायटीच्या व्यवस्थापनाची निष्काळजीपणा व हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत फिर्यादी रितेश सुरंगे (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार निसर्ग हौसिंग सोसायटी बी विंगचे चेअरमन पुंडलिक वारके व इतर पदाधिकाऱ्यांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०६(१), १२५ तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खामगळ करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!