spot_img
spot_img
spot_img

कवयित्री मेहमूदा रसुल शेख यांना देहूगाव येथे ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार 2026’ ने सन्मानित

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दिनांक 26/03/2026 रामनवमीच्या पवित्र दिनी देहू गावची कन्या मेहमूदा रसुल शेख (लेखिका,कवयित्री, लावणी कारा,गझलकारा) यांना राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टी देहू शहर यांच्या वतीने ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 2026 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपला हा पुरस्कार नसून या गावाने आपल्या पाठीवरती दिलेली शाबासकीची थाप आहे असे असे म्हटले आहे.. देहू गावातील हा त्यांना मिळालेला चौथा पुरस्कार आहे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या ‘माहेर सुने झाले ‘ व ‘भारतमाता’ दोन कवितांनी आलेल्या सर्व महिलांना मंत्रमुग्ध केले.. आपल्याला आतापर्यंत राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत पण आपल्या गावातील या पुरस्काराचे आपल्या काळजात एक विशिष्ट स्थान आहे त्याच्यापुढे मी सदा नतमस्तक आहे हा बहुमान माझा एकटीचा नसुन माझ्या गावातील माझ्या सर्व माता भगिनींचा आहे असे त्या अभिमानाने सांगतात… या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी मा. सुनिल आण्णा शेळके (आमदार मावळ विधानसभा) यांच्या अर्धांगिनी सारीकाताई शेळके यांची व देहू शहराध्यक्षा मेघाताई काळोखे, कार्याध्यक्षा सारिका ताई काळोखे , नगराध्यक्षा पूजाताई दिवटे पुणे जिल्हा उपाध्याक्षा वैशालीताई टिळेकर, यांची प्रमुख उपस्थिती लाभली… जेव्हा आपल्या गावात आपल्याला आपल्याच माणसांकडून पुरस्कार मिळतो तेव्हा आपला ऊर अभिमानाने फुलतो असे उद्गार कवियत्री मेहमूदा रसुल शेख यांनी काढले.. या कार्यक्रमासाठी आपल्या सोबत पुरस्कार मिळालेल्या सर्व महिलांचे त्यांनी अभिनंदन केले आपल्याच माता भगिनींच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुरस्कृत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टी देहूगाव यांचे आभार न मानता मी त्यांच्या ऋणात राहू इच्छिते असे गौरवोद्गार त्यांनी काढले आहे…

मेहमूदा रसुल शेख यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे नातेवाईक,सगे सोयरे, मित्र-मैत्रिणी, व सा-या पंचक्रोशीत त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!