spot_img
spot_img
spot_img

बंदी असलेल्या गुटखा-पानमसाल्याचा साठा; दुकानदार अटकेत

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

चिंचवड परिसरात बंदी असलेल्या गुटखा व पानमसाल्याचा साठा करून विक्री करणाऱ्या दुकानदारावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील लक्ष्मी पान शॉपवर अन्न सुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांनी छापा टाकला असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू असा एकूण ६,९४१ रुपयांचा साठा आढळून आला.

महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अशा पदार्थांच्या उत्पादन, साठा व विक्रीवर बंदी घातलेली असतानाही आरोपी राहुल मिश्रा हा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठा करत असल्याचे उघड झाले.

या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!