spot_img
spot_img
spot_img

भोसरी MIDC मध्ये लघुउद्योगाला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी परिसरात एका लघुउद्योग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली.

या आगीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक साहित्य व पार्ट्स जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तत्परतेने आग आटोक्यात आणली.

प्राथमिक तपासात ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, संबंधित कंपनी अनधिकृत असल्याची माहितीही या घटनेनंतर समोर आली असून प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!