spot_img
spot_img
spot_img

भरदिवसा चैन स्नॅचिंग! दुचाकीस्वाराकडून ४.४४ लाखांची सोन्याची चैन लंपास

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

खेड तालुक्यातील आंबेठाण परिसरात भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या अल्पवयीन आरोपीने धाडसी चैन स्नॅचिंग करत सुमारे ४.४४ लाख रुपयांची सोन्याची चैन लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २६ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास घाटे वस्ती, आंबेठाण (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी रुपेश आंबुदास कौटकर (वय ३८, रा. काळुस, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून पोकलंड ऑपरेटर राजेश कुशवाह यांना घेऊन महाळुंगेहून आंबेठाणकडे जात असताना, मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना लक्ष्य केले. संधी साधून आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे ३४.९८० ग्रॅम वजनाची, अंदाजे ४ लाख ४४ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून पळ काढला.

या प्रकरणात आरोपी हा विधीसंघर्षीत बालक असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भरदिवसा घडलेल्या अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!