पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
चिखली परिसरात भाड्याने घेतलेली कार परत न करता विश्वासघात केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ मार्च २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास टॉवर लाईन चौक, तळवडे रोड, चिखली येथील जान्हवी मेडिकल दुकानाचे मालक सुरज सुभाष वायकर (वय २५, रा. रुपीनगर, तळवडे) यांच्याकडून आरोपी सवाई भिका राम (वय २५, सध्या रा. कात्रज, पुणे; मूळ रा. राजस्थान) याने ओळख वाढवून विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीने “भाड्याने घेण्यासाठी” असा बहाणा करून फिर्यादीकडील पांढऱ्या रंगाची हुंदाई कंपनीची वेन्यु कार (क्र. MH-14 JM-8926) ताब्यात घेतली. मात्र, कार नेल्यानंतर ती परत न करता आरोपी फरार झाला. या घटनेत फिर्यादीचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजि. नं. १७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार व्होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.



