शबनम न्यूज | प्रतिनिधी
माथाडी कायद्याचे जनक स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा जागर करण्यात आला.
यावेळी के. एस. बी. चौक, चिंचवड येथे स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद म्हणाले की, “स्व. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून आजही कामगारांच्या संघर्षाला दिशा देणारे आहे.”
कार्यक्रमास महाराष्ट्र मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, जनरल सेक्रेटरी प्रविण जाधव यांच्यासह मातोश्री पतसंस्था अध्यक्ष पांडुरंग कदम, पांडुरंग काळोखे, अप्पा कौदरे, सर्जेराव कचरे, हनुमंत तरडे, पांडुरंग पठारे, अशोक साळुंखे, रायरेश्वर पतसंस्था अध्यक्ष सतीश कंटाळे, गोरक्ष दुबाले, समर्थ नाईकवाडे, नागेश व्हनवटे, मनोज मंजाळ, अमित पासलकर, बबन काळे, दादा कदम, उद्धव सरोदे, माऊली पाचपुते, श्रीकांत मोरे, भारत मंजाळ, विश्वनाथ गांगड, गुलाब शिंदे, विक्रम मोरे, नाना नाईकवाडे, विजय खंडागळे, गिरीश देशमुख, रतन भोजने, आयुष शिंदे, गणेश नाईकवाडे, भरत मंजाळ तसेच सर्व पदाधिकारी, विविध माथाडी टोळ्यांचे मुकादम व मोठ्या संख्येने सभासद कामगार उपस्थित होते.



