spot_img
spot_img
spot_img

‘पीसीयू वूमन लीडरशिप कॉन्क्लेव्ह’ मध्ये उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ महिलांची उपस्थिती

शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाद्वारे महिला देखील उद्योग व्यवसायात कर्तृत्व सिद्ध करू शकतात असे प्रतिपादन हावरे इंजिनिअर्स अँड बिल्डर्स प्रा. लि. च्या व्यवस्थापकीय संचालिका उज्ज्वला हावरे यांनी केले.
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेलच्या (आयआयआयसी) वतीने आयोजित केलेल्या “पीसीयू वूमन लीडरशिप कॉन्क्लेव्ह २०२६” मध्ये हावरे यांनी मार्गदर्शन केले.
    यावेळी पीसीइटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यामध्ये विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. उद्योग क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळाल्यास विद्यार्थ्यांना व्यावहारिक दृष्टिकोन प्राप्त होतो आणि ते आपल्या करिअर मध्ये यशस्वी होऊ शकतात. पीसीयू हे एक बहुविषयक विद्यापीठ असून शैक्षणिक उत्कृष्टता, उद्योगाभिमुख शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम यासाठी वचनबद्ध आहे. नेतृत्व कॉन्क्लेव्ह, उद्योग संवाद आणि जागतिक सहकार्य यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यापीठ विद्यार्थ्यांना भविष्यातील व्यावसायिक आव्हानांसाठी सक्षम बनवत आहे.
   यावेळी कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे, पीसीयू व्यवस्थापन समिती सदस्य सचिन इटकर, प्र-उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, रजिस्ट्रार डॉ. अनिल महेश्वरी आणि डॉ. पुरबी गराई (शास्त्रज्ञ, डीआरडीओ), डॉ. मीताली मोरे (एमएसएमई मेंटर), डॉ. तृप्ती रामाने (संचालक, महाराष्ट्र स्टेट बिझनेस असोसिएशन), ॲड. प्रीती परदेशी (उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन), तन्वी औरडकर (संस्थापक, कार्पेडियम), अनुराधा ठाकूर (एचआर बिझनेस पार्टनर, वेसुवियस ग्रुप), रती चौंडावर (हेड एचआर, पोसिव्ह्यू टेक्नॉलॉजीज), डॉ. जहानआरा पठाण शेरडी (सिनियर मॅनेजर, रिक्रूटमेंट अँड आउटप्लेसमेंट, क्वेस कॉर्प), ज्योती यादव (टॅलेंट ॲडक्विझिशन मॅनेजर, कॅव्हिस्टा) आणि वैशाली दराडे (सिनियर एचआर, मॅग्ना इंटरनॅशनल) आदी उपस्थित होते.
    कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, प्रगत आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये उद्योग क्षेत्रातील महिला प्रतिनिधी, तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.
    यावेळी सचिन इटकर यांनी आर्थिक आणि उद्योग क्षेत्रात महिलांची वाढती भूमिका महत्वपूर्ण आहे असे मत व्यक्त केले. 
    ही परिषद पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती.
    डॉ. प्रणव चरखा (संचालक, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेल) आणि डॉ. अर्चना राठोड (संचालक, विद्यार्थी विकास विभाग) यांनी संयोजन केले, तर अक्षता राजगुरू यांनी सूत्रसंचालन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!