spot_img
spot_img
spot_img

तळेगावात ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ११.२० लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

तळेगाव दाभाडे येथे ऑनलाइन शेअर मार्केट शिकवण्याच्या आमिषाने एका नागरिकाची तब्बल ११ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ ऑक्टोबर २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत तळेगाव दाभाडे येथील फिर्यादींच्या राहत्या घरी घडली. याबाबत विजय चंद्रकांत शहाणे (वय ५८, रा. शहा कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे मोबाईलवरून स्टॉक मार्केटचे शिक्षण घेण्यासाठी गुगलवर शोध घेत असताना “इक्विटी पल्स” नावाच्या वेबसाईटवर त्यांचा संपर्क आरोपींशी आला. आरोपी कौस्तुभ टांकसाळे याने फिर्यादींना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर शुभंकर शर्मा याने स्टॉक मार्केटचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली “EPQC PRIME” नावाचे ट्रेडिंग अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.

सदर अॅप हे सेबीकडून नोंदणीकृत असल्याचा बनाव करून आरोपींनी विश्वास संपादन केला. तसेच ब्रेकर धीरज अग्रवाल याच्यासोबत गुंतवणुकीचा करार करून देत मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला भुलून फिर्यादींनी वेळोवेळी एकूण ११,२०,००० रुपये ऑनलाइन गुंतवले.

मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा न मिळाल्याने आणि संपर्क तुटल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

या प्रकरणी भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!