spot_img
spot_img
spot_img

भोसरीत कंपनीत घरफोडी; कंपाऊंड कापून १.१६ लाखांचा माल लंपास, आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

भोसरी औद्योगिक परिसरातील एका कंपनीत कंपाऊंड कापून आत प्रवेश करत घरफोडी करून साहित्य चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते २२ मार्च रोजी सकाळी ६.१५ या दरम्यान एस-ब्लॉक, भोसरी येथील क्वाड्रोजन इंडिया प्रा. लि. कंपनीत घडली. याबाबत संतोष नंदन माटे (वय ४४, रा. दापोडी, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी जावेद निजाम शेख (वय २४, रा. बालाजी नगर, भोसरी) याने कंपनीच्या भिंतीलगत असलेले तारेचे कंपाऊंड कापून आत प्रवेश केला. त्यानंतर कंपनीतील पाईप, रॉड तसेच जाड प्लेट्स असा एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा माल चोरी करून नेल्याचे उघड झाले आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मालाबाबत अधिक तपास सुरू आहे.

या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०५(अ), ३३१(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दगडगावे करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!