spot_img
spot_img
spot_img

“भोंदू बाबा अशोक खरात ‘सडका आंबा’ – नितेश राणे यांचा संताप; पत्रकारांना उलट प्रश्न”

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आपण फारसे बोलताना दिसत नाही, असा सवाल पत्रकारांनी केला असता मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला.
“आम्ही गप्प आहोत असं कोण म्हणतं? काय करायला पाहिजे ते तुम्हीच सांगा,” असा प्रति-सवाल त्यांनी पत्रकारांना केला.

पिंपरी-चिंचवड शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, “ज्या महिलांवर अन्याय झाला आहे त्यांनी पुढे येऊन सरकारशी संपर्क साधावा, आम्ही त्यांना मदत करू. प्रत्येक धर्मात काही ‘सडके आंबे’ असतात. अशोक खरात हा हिंदू धर्मातील सडका आंबा आहे, पण त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही.”

तसेच, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील,” असा दावा त्यांनी केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!