पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
चाकण परिसरात बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. मात्र संबंधित आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
निखिल बाळासाहेब वर्षे (पोलीस शिपाई) यांच्या फिर्यादीवरून उत्तर चाकण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कृष्ण बहादुर सिंग (वय २७, रा. आंबेठाण, चाकण) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेठाण चौकातील ‘साई हॉटेल अँड चायनिज सेंटर’ येथे आरोपी बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारू साठवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार टाकलेल्या कारवाईत सुमारे १७,५०० रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.



